रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम

Mar 1, 2007

पाण्याचा थेंब...

केसात पाण्याचा थेंब असा चमकत आहे
जसा बंदीत पडलेला एक एकाकी काजवा!

काय बिघडले छत जरा गळू लागले तर?

गुलजार - त्रिवेणी (पृ. क्र. ६)
-----

हे वाचून एकच प्रार्थना आहे देवा कडे. संकटे, कठीण प्रसंग यायचे तेव्हा येतीलच. पण ही अशी मस्त धुंद सौदर्यदृष्टी कायम जागृत ठेव म्हणजे पावलास!

2 comments:

Yogesh said...

सुनील, तुम्हाला "रानातील प्रकाश" हे नाव जीएंच्या पुस्तकावरून सुचले का?

Sunil Kashikar said...

हो. मी हे नाव जी.ए. यांच्या "रानातील प्रकाश" ह्या अनुवादित पुस्तकाच्या नावावरुन ठेवले आहे. (मुळ पुस्तक: The Light in the Forest/Conrad Richter). वाचले आहे का?

नोंद: मी एक (मनाने) तरुण ब्लॉगर आहे. मला "तुम्हाला" वगैरे करु नकोस. अगदी कानात जातं ;)