रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम

May 1, 2006

उदासीनता

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही ह्र्दयाला
काय बोंचतें तें समजेना
ह्र्दयाच्या अंतह्र्दयाला. १.

येथें नाहीं तेथें नाहीं,
काय पाहिजे मिळवायला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हांका मारी जीव कुणाला? २.

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरें पाडिती पण ह्र्दयाला
तीव्र वेदना करिती, परी ती
दिव्य औषधी कसली त्याला? ३.

- बालकवी

1 comment:

Sumedha said...

वा! फारच सुंदर कविता नोंदल्या आहेत! छान खजिना मिळाल्यासारखं वाटतय. अशाच अजून खूप वाचायला मिळतील (समीक्षेसह :) ) अशी आशा आहे!